महाराष्ट्राच्या संतपरंपरेने समाजाला भक्ती, समता, मानवता आणि निसर्गप्रेमाची शिकवण दिली आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आणि जीवनकार्याद्वारे समाजाला एक नवीन दिशा दिली. आजच्या आधुनिक युगात या संतपरंपरेचा वारसा जपत संतांच्या पवित्र भूमीचे रक्षण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये तुकयाभक्त मधुसूदन पाटील महाराज यांचे नाव विशेष आदराने घेतले …
Read More »संतभूमी संरक्षक संघर्ष चळवळ : संतांची पवित्र भूमी, निसर्ग आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी उभे राहिलेले महाराष्ट्राचे जनआंदोलन
महाराष्ट्राची ओळख ही केवळ राजकीय किंवा भौगोलिक सीमांमुळे नाही, तर संतांच्या विचारांनी, वारकरी परंपरेने आणि अध्यात्मिक संस्कारांनी घडलेली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि असंख्य संतांनी या भूमीला भक्ती, समता, मानवता आणि निसर्गप्रेमाचे अधिष्ठान दिले. या संतांनी पावन केलेल्या भूमी केवळ …
Read More »“जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट…” हा अभंग प्रक्षिप्त असण्याची शक्यता : एक चिकित्सक दृष्टिकोन
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगसाहित्यात सामाजिक समता, गुणाधिष्ठित मूल्यव्यवस्था, सत्यनिष्ठा आणि अंधश्रद्धाविरोधी प्रखर भूमिका सातत्याने आढळते. तथापि, उपलब्ध तुकाराम गाथेत काही अभंग असे आहेत की, ते तुकोबांच्या एकूण वैचारिक भूमिकेशी विसंगत वाटतात. त्यांपैकी सर्वाधिक चर्चिला जाणारा अभंग म्हणजे – “जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥” …
Read More »संतश्रेष्ठ तुकोबाराय : वैकुंठगमन, निर्वाण आणि संशोधनाची गरज
”ज्ञानबा-तुकाराम” ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची केवळ दोन नावे नाहीत, तर महाराष्ट्राच्या आत्म्याची दोन स्पंदने आहेत. साने गुरुजींनी स्वप्न आणि सत्य या ग्रंथात म्हटले आहे की, “ज्ञानबा-तुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे, कारण ते सर्व थरांपर्यंत पोहोचले आहे.” संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगवाणीत केवळ भक्तिभाव नाही, तर …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः