मराठा साम्राज्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्याइतकेच काही पराक्रमी सेनानी आपल्या शौर्य, धैर्य आणि युद्धकौशल्यामुळे अजरामर झाले. या महान सेनापतींमध्ये रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. इ.स. १६८९ ते १६९७ या काळात त्यांनी मराठा स्वराज्याच्या संरक्षणाची धुरा समर्थपणे सांभाळली. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर …
Read More »स्वराज्याचे अदृश्य शिल्पकार : बहिर्जी नाईक आणि शिवरायांचे गुप्तहेर जाळे
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ तलवारीच्या बळावर निर्माण झाले नाही. त्यामागे पराक्रमी मावळे, दूरदर्शी राजकारण, सक्षम प्रशासन आणि अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर व्यवस्था यांचा सिंहाचा वाटा होता. युद्धात तलवार जितकी महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची असते शत्रूची अचूक माहिती. शत्रूच्या हालचाली, राजकीय घडामोडी, सैन्यबळ, खजिन्याची ठिकाणे, हल्ल्याचे मार्ग आणि …
Read More »वेदोक्त संघर्षातून घडलेले राजर्षी शाहू महाराजांचे समाजक्रांतीचे युग
भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सुधारणांनी भारतीय समाजजीवनाला नवी दिशा दिली. त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक गाजलेली आणि दूरगामी परिणाम घडवून आणणारी घटना म्हणजे “वेदोक्त प्रकरण”. हे प्रकरण केवळ धार्मिक विधींच्या अधिकारापुरते मर्यादित नव्हते, तर भारतीय समाजातील वर्णव्यवस्था, सामाजिक वर्चस्व …
Read More »स्वातंत्र्याचा पहिला रणशिंगनाद : छत्रपती शिवाजी महाराज
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा विचार करताना इ.स. १८५७ मधील उठावाला “भारतीय स्वातंत्र्यसमराचा श्रीगणेशा” असे संबोधले जाते. अनेक इतिहासकारांनी या उठावाचे महत्त्व अधोरेखित केले असून त्यातील काही व्यक्तिमत्त्वांचे मोठ्या प्रमाणावर गौरवीकरणही केले आहे. तथापि, इतिहासाचा अभ्यास केवळ प्रचलित मतांच्या आधारे न करता, निरपेक्षपणे आणि व्यापक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. कारण इतिहास हा …
Read More »आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक : विस्मृतीत गेलेला स्वातंत्र्याचा पहिला हुंकार
हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काही घटनांची नोंद इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी झाली, तर काही घटना आणि त्यांचे नायक काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीही इंग्रजी सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले होते. अशाच एका उठावाद्वारे इंग्रज सत्तेला सलग अनेक वर्षे सळो की पळो करून सोडणारा, स्वातंत्र्याचे स्वप्न सर्वप्रथम …
Read More »रा.ग. गडकरीचा राजसंन्यास : साहित्यिक स्वातंत्र्य की ऐतिहासिक अन्याय?
कला, लेखनकौशल्य, प्रतिभा आणि बौद्धिक क्षमता यांचा वापर प्रत्येक व्यक्ती आपल्या वैचारिक भूमिका, सामाजिक जाणीवा आणि विशिष्ट उद्दिष्टांनुसार करत असते. काहीजण समाजप्रबोधनासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी आणि सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या कला आणि प्रतिभेचा उपयोग करतात. तर काही इतिहास संशोधक, लेखक आणि विचारवंत इतिहासाशी प्रामाणिक राहून ऐतिहासिक महापुरुषांनी दिनदुबळ्या, वंचित आणि बहुजन …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः