Features

शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील : बहुजन शिक्षणक्रांतीचे शिल्पकार

   ”शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे,” या विचाराला आपल्या संपूर्ण आयुष्याचे ध्येय बनवून ग्रामीण, गरीब आणि वंचित समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहेत. त्यांनी केवळ शाळा आणि महाविद्यालये उभी केली नाहीत, तर शिक्षणाला सामाजिक न्याय, स्वाभिमान …

Read More »

समताप्रिय संतशिरोमणी संत नामदेव महाराज : भक्ती, समता आणि सामाजिक प्रबोधनाचे अध्वर्यू

   महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संतशिरोमणी संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. वारकरी संप्रदायातील हे श्रेष्ठ संत केवळ भक्तिकाव्याचे रचनाकार नव्हते, तर ते समाजप्रबोधन, सामाजिक समता, मानवतावाद आणि लोकधर्माचे प्रभावी पुरस्कर्ते होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर भारतापर्यंत पोहोचला. विशेषतः पंजाबमधील शीख परंपरेतही संत नामदेव महाराजांना अत्यंत …

Read More »

आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक : विस्मृतीत गेलेला स्वातंत्र्याचा पहिला हुंकार

   हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काही घटनांची नोंद इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी झाली, तर काही घटना आणि त्यांचे नायक काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीही इंग्रजी सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले होते. अशाच एका उठावाद्वारे इंग्रज सत्तेला सलग अनेक वर्षे सळो की पळो करून सोडणारा, स्वातंत्र्याचे स्वप्न सर्वप्रथम …

Read More »

रा.ग. गडकरीचा राजसंन्यास : साहित्यिक स्वातंत्र्य की ऐतिहासिक अन्याय?

   कला, लेखनकौशल्य, प्रतिभा आणि बौद्धिक क्षमता यांचा वापर प्रत्येक व्यक्ती आपल्या वैचारिक भूमिका, सामाजिक जाणीवा आणि विशिष्ट उद्दिष्टांनुसार करत असते. काहीजण समाजप्रबोधनासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी आणि सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या कला आणि प्रतिभेचा उपयोग करतात. तर काही इतिहास संशोधक, लेखक आणि विचारवंत इतिहासाशी प्रामाणिक राहून ऐतिहासिक महापुरुषांनी दिनदुबळ्या, वंचित आणि बहुजन …

Read More »