Features

Tag Archives: दख्खन इतिहास

स्वातंत्र्याचा पहिला रणशिंगनाद : छत्रपती शिवाजी महाराज

   भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा विचार करताना इ.स. १८५७ मधील उठावाला “भारतीय स्वातंत्र्यसमराचा श्रीगणेशा” असे संबोधले जाते. अनेक इतिहासकारांनी या उठावाचे महत्त्व अधोरेखित केले असून त्यातील काही व्यक्तिमत्त्वांचे मोठ्या प्रमाणावर गौरवीकरणही केले आहे. तथापि, इतिहासाचा अभ्यास केवळ प्रचलित मतांच्या आधारे न करता, निरपेक्षपणे आणि व्यापक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. कारण इतिहास हा …

Read More »

“इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे” : लोकस्मृतीतील बळीराजा

   भारतीय समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक जाणिवांचा अभ्यास करताना बळीराजाचे स्थान समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. विशेषतः शेतकरी, बहुजन आणि श्रमजीवी समाजाच्या दृष्टीकोनातून बळीराजाचा इतिहास आणि त्याच्याभोवती निर्माण झालेल्या परंपरा, कथा आणि प्रतीकांचे पुनर्वाचन करणे आवश्यक आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी आपल्या लेखनातून आणि सामाजिक विचारातून बळीराजाला विशेष स्थान दिले. …

Read More »

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सामाजिक न्यायाच्या लढ्यातील ऐतिहासिक मैत्री

   भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते हे केवळ दोन महान व्यक्तिमत्त्वांमधील स्नेहसंबंध नव्हते, तर ते सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन मुक्तीच्या सामायिक ध्येयातून निर्माण झालेले ऐतिहासिक सहकार्य होते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी बहुजन, शोषित आणि अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या या दोन …

Read More »

मानवतेचे महान उपासक संत गाडगे महाराज : सेवा, स्वच्छता आणि समाजप्रबोधनाचे युगपुरुष

   ”मनुष्य हा उमललेल्या फुलासारखा असतो. त्याचे जीवन केवळ स्वतःसाठी नसून इतरांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी, त्यांच्या जीवनात आनंद आणि चेतनेचा प्रकाश पसरविण्यासाठी असते.” ही भावना ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या आचरणातून जगासमोर मांडली, ते म्हणजे संत गाडगे महाराज. त्यांनी आपल्या कार्यातून मानवतेची अशी गंगा प्रवाहित केली की, तिचा लाभ केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, …

Read More »

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके : इतिहासलेखनातील विसंगती की ऐतिहासिक उपेक्षा?

   इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध सशस्त्र संघर्ष उभारणाऱ्या क्रांतिकारकांच्या इतिहासात आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, मुख्य प्रवाहातील इतिहासलेखनात त्यांना अपेक्षित ते स्थान मिळाले का, हा प्रश्न आजही अनेक अभ्यासक, लेखक आणि सामाजिक विचारवंत उपस्थित करीत आहेत. विशेषतः “आद्यक्रांतिकारक” ही पदवी कोणाला द्यावी, या संदर्भात इतिहासात आणि सार्वजनिक …

Read More »

शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील : बहुजन शिक्षणक्रांतीचे शिल्पकार

   ”शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे,” या विचाराला आपल्या संपूर्ण आयुष्याचे ध्येय बनवून ग्रामीण, गरीब आणि वंचित समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहेत. त्यांनी केवळ शाळा आणि महाविद्यालये उभी केली नाहीत, तर शिक्षणाला सामाजिक न्याय, स्वाभिमान …

Read More »

समताप्रिय संतशिरोमणी संत नामदेव महाराज : भक्ती, समता आणि सामाजिक प्रबोधनाचे अध्वर्यू

   महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संतशिरोमणी संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. वारकरी संप्रदायातील हे श्रेष्ठ संत केवळ भक्तिकाव्याचे रचनाकार नव्हते, तर ते समाजप्रबोधन, सामाजिक समता, मानवतावाद आणि लोकधर्माचे प्रभावी पुरस्कर्ते होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर भारतापर्यंत पोहोचला. विशेषतः पंजाबमधील शीख परंपरेतही संत नामदेव महाराजांना अत्यंत …

Read More »

आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक : विस्मृतीत गेलेला स्वातंत्र्याचा पहिला हुंकार

   हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काही घटनांची नोंद इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी झाली, तर काही घटना आणि त्यांचे नायक काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीही इंग्रजी सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले होते. अशाच एका उठावाद्वारे इंग्रज सत्तेला सलग अनेक वर्षे सळो की पळो करून सोडणारा, स्वातंत्र्याचे स्वप्न सर्वप्रथम …

Read More »

रा.ग. गडकरीचा राजसंन्यास : साहित्यिक स्वातंत्र्य की ऐतिहासिक अन्याय?

   कला, लेखनकौशल्य, प्रतिभा आणि बौद्धिक क्षमता यांचा वापर प्रत्येक व्यक्ती आपल्या वैचारिक भूमिका, सामाजिक जाणीवा आणि विशिष्ट उद्दिष्टांनुसार करत असते. काहीजण समाजप्रबोधनासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी आणि सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या कला आणि प्रतिभेचा उपयोग करतात. तर काही इतिहास संशोधक, लेखक आणि विचारवंत इतिहासाशी प्रामाणिक राहून ऐतिहासिक महापुरुषांनी दिनदुबळ्या, वंचित आणि बहुजन …

Read More »